तुळजापूर दि २१ :
जवाहर नवोदय विद्यालयात सोमवार दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून उत्साहात सकाळी ६ वाजता साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे, उपप्राचार्य एस. वी. स्वामी, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यालय परिवारातील सदस्य उपस्थित होते .
प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी योगाचे महत्व ,योगामुळे आपले आरोग्य निरोगी कसे राहते, कोरोना, धावपळीच्या युगात योगाची कशी आवश्यकता आहे यावर विचार व्यक्त केले .
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आर .एम. अलसेट, क्रीडा शिक्षिका एस आर अलसेट यांनी भुजंगासन ,वक्रासन ,प्राणायाम, शवासन ,पद्मासन, त्रिकोणासन, वृक्षासन ,धनुरासन, ताडासन या वेगवेगळ्या योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली.