तुळजापूर ,दि.२३: 

तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे  आमदार राणाजगजितसिह  पाटील यांच्या  आमदार निधीतुन देवीच्या मंदिरातील सभामंडपाचे व बाळेश्वर मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन आमदार पाटील यानी केले.

यावेळी आमदार पाटील बोलताना  म्हणाले की, आध्यात्मिक शक्ती जीवनाला आधार देत असते. या कामांमुळे नागरिकांना प्रसन्न मनाने परमेश्वराची साधना करता येईल, याचे समाधान वाटते. बाळेश्वर महिला उमेद ग्रामसंघ अंतर्गत घरकुल मार्टला सदिच्छा भेट दिली.

तसेच येथील भवानी शंकर ऍग्रो प्रोड्युसर कंपनीस भेट दिली, यावेळी लाकडी तेल घाना व दूध डेअरी संकलनाची माहिती घेतली.   सुधीर सुपनार यांच्या पुढाकारातून होतकरू तरुणांनी एकत्रित येऊन उभारलेला हा प्रकल्प कौतुकास्पद आहे.
 
Top