तुळजापूर, दि .२३ : डॉ. सतीश महामुनी


तुळजापूर नगरपरिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या महत्त्वाच्या प्रश्नाचे इतर २५ विषयांना मंजुरी देण्यात आली, नगर परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सचिन रोचकरी होते.

बुधवारी झालेल्या  सभेस नगरसेवक पंडित जगदाळे, संतोष कदम , बापूसाहेब कने, विजय कंदले, अमर मगर, सुनील रोजकरी,सौ. भोसले, सौ. अश्विनी रोचकरी, सौ हेमा कदम, सौ मंजुषा देशमाने, सौ कदम कार्यालय अधीक्षक वैभव पाठक महादेव सोनार यांची उपस्थिती होती.

तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक दहा मध्ये होणाऱ्या विविध विकास कामांची प्रस्तावित प्रकरणे, पंतप्रधान आवास योजना, आमदार आणि खासदार यांच्या निधीमधून विकास कामांची निवड करणे, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे मधून केल्या जाणाऱ्या रस्त्याचे प्रस्ताव, नव्याने सरकारने घेतलेले सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दहा लाख रुपयांच्या आतील विकासकामांचे वितरण करण्याचा महत्त्वाचा प्रश्न याविषयी या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करण्यात आली.

दुपारी साडेबारा ते पावणे एक दरम्यान ही वार्षिक सर्वसाधारण सभा तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कक्षामध्ये संपन्न झाली.
 
Top