तुळजापूर , दि . २१ :

भारतीय जनता पार्टी तुळजापुरच्या वतीने दि. २१ जून रोजी दि. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग कार्यशाळेत जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.

योगदिनाचे उद्घाटन  भाजपाचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, तुळजापूर विकास प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे , आनंद कंदले,गिरीश देवळालकर, रामचंद्र गिड्डे, हणमंत गपाट,अविनाश धट,राम चोपदार,विशाल टोले, अनिल आगलावे,बालाजी बाशेवाड,सागर पारडे,योग प्रशिक्षक राजेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी अनुलोम विलोम प्राणायाम आँक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी भस्त्रिका व उद्गित प्राणायाम तसेच हृदय व फुफूसांची क्षमता वाढवण्यासाठी मंडुकासन, उष्टासन, मकरासन,शलभासन,भुजंगासन या आसनाचे प्रात्यक्षिक व सराव करण्यात आला.
 
Top