नळदुर्ग , दि.२१

 कोरोना प्रतिबंधक लस येवती ता.तुळजापूर येथिल  ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध झाल्याने  सोमवार दि. २१ जुन रोजी  लसीकरणास  नागरिकांनी उत्सर्फुत  प्रतिसाद दिला. 

शंभर  लस उपलब्ध झाल्या होत्या. पण त्याही संपल्या. शिवसेनेचे उस्मानाबाद  जिल्हा प्रमुख तथा  आमदार  कैलास  पाटील यांना फोनवरुन माहिती देवुन लसची मागणी केल्याने  50 लस  आधिक मागवून घेतल्या. या लसीकरणात  सरपंच पूजा अमोल गवळी, उपसरपंच प्रितम गायकवाड ,ग्रामसेवक  एस. एस. खोपडे,  डॉ मलय्या  स्वामी, श्रीमती माने एस. एस , श्रीमती राजमा इनामदार , डांगे एन एन,  आरोग्य सेवक सचिन तांबे  , विक्रम गवळी , गायकवाड शांताराम , जानराव मिलिंद , श्रीमती निळाबाई ढोले, श्रीमती शारदा  तांबे, ग्रामपंचायत शिपाई बाळासाहेब शिंदे , हरी सलगर,  अंगद कांबळे' सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यां आदीनी  लसीकरणात मोलाची कामगिरी केल्याबद्दल येवती ग्रामपंचायती च्यावतीने आभार  मानण्यात आले.
 
Top