तुळजापूर, दि. २१ :
गेल्या तीन दिवसापासून तुळजापूर शहरात सुरू असलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला मंकावती गल्ली येथील नागरिकांनी उत्सर्फुतपणे प्रतिसाद दिला. या प्रभागाचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी लोकांना लसीकरणासाठी विशेष निमंत्रित केले होते.
मंकावती गल्ली विठ्ठल मंदिर या ठिकाणी नगराध्यक्ष सचिन रोचकरी मुख्याधिकारी लोकरे , रुग्ण सेवा समिती सदस्य आनंद कंदले, युवा नेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंकावती गल्ली, खडकाळ गल्ली, साळुंके गल्ली, कासार गल्ली, आर्य चौक येथील ४५ वयाच्या वरील सर्व नागरिकांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते .
यावेळी प्रत्येक लस घेणाऱ्या नागरिकाला तसेच उपजिल्हा रुग्णालयातील समस्त कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी बांधवांना युवा नेते विनोद गंगणे यांच्या माध्यमातून प्रत्येकी एक टिफिन बॉक्स भेट देण्यात आला.
माजी नगरसेवक सुहास साळुंके यांनी कार्यक्रमात बैठक व्यवस्था केली होती. लसीकरण केंद्राचे उद्घाटन
नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, शिवाजी बोधले, गुलचंद व्यवहारे, नागेश नाईक, सुहास साळुंके, माऊली भोसले, शांताराम पेंदे,नगरसेवक सुनील रोचकरी, खंडु गवळी, राजेश देशमुख, सागर गंगणे,, रत्नदीप भोसले, यांसह नगरपरिषद येथील कर्मचारी व कार्यकर्त्यांनी ही परिश्रम केले.