तुळजापूर, दि. २१ :
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तुळजापूर येथील संस्कार भारतीच्या वतीने कमान वेस येथील डुल्या मारुती मंदिरात रांगोळी रेखाटन करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी तुळजापूर संस्कारभारतीच्या कलावंतांनी कमान वेस येथील डुल्या मारूती हनुमान मंदिर येथे आकर्षक रांगोळी काढून योग दिनाच्या निमित्ताने शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी प्रांताचे संघटनमंत्री डॉ.सतिश महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्कार भारतीचे अध्यक्ष पद्माकर मोकाशे, सचिव सुधीर महामुनी, उपाध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे, मातृशक्ती प्रमुख सौ गीता व्यास, संरक्षक श्रीमती वनमाला मस्के, रांगोळी कलावंत अभिषेक लसणे, ओंकार लसणे, लक्ष्मीकांत सुलाखे, नंदकुमार पोतदार, संदिप रोकडे, सौ. माधुरी कनगरकर , एस एन कुलकर्णी, महेश कुलकर्णी, प्रसाद महामुनी आदि कलावंत उपस्थित होते.