काटी दि. २८
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर विधानसभा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे आभिनंदन होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार पक्षाचे ध्येय धोरण लक्षात घेऊन जनमानसातील आत्मविश्वास व शक्ती वाढवण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून कार्यक्रम राबवण्यासाठी पक्षाचा प्रसार करून संघटनात्मक कार्य करण्यासाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, धैर्यशील पाटील,शहर अध्यक्ष नितीन रोचकरी, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष विकी घुगे, महेश चोपदार, अमर चोपदार, मिडिया सेल तालुका अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, दिलीप मगर, अण्णा कोडकर, निरंजन करंडे, अनिल पारवे, रुबाब पठाण, त्रिगुणशील साळुंके, बबन हेडे, दिनकर पवार, भास्करराव पवार, बबलु सुर्यवंशी, गोरख पवार आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.