इटकळ दि.३ :
दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या आपघातात दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला. हा आपघात इटकळ तुळजापूर राज्यर्गावर धायफुले मिलजवळ  बुधवार दि.२ जुन रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाला.


रविंद्र मधुकराव पाटील वय  ४२ वर्ष ,राहणार बाभळगाव ता.तुळजापूर व इब्राहिम मलिक पटेल वय (४०) रा.पिंजरवाडी ता.द.सोलापूर असे आपघातात मृत्यु  झालेल्या  दोघाचे नावे आहेत. 

रविंद्र पाटील हे मोटारसायकल क्र. एमएच २५ ए ए १०२१ या आपल्या गावाकडे येत होते. तर इब्राहिम पटेल हे एमएच १३बीजीं २४०६ या  दुचाकीवरुन तुळजापूरकडे जात होते. इटकळ तुळजापूर राज्यमार्गवर धायफुले मिलजवळ दोन्ही दुचाकीची धडक झाली.यामध्ये दोघांनाही जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार करीत आसताना त्यांचा मृत्यू झाला.  

दरम्यान रविंद्र पाटील यांचे निधन झाल्याचे समजताच बाभळगावावर शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top