उस्मानाबाद दि.२८ :

पोलीस ठाणे उमरगा:  अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा  पो.ठा. च्या पथकाने दि. 27 जून रोजी

एम एस ई बी ऑफिस जवळ बलसुर ते कलदेव लिबांळा जाणारे रोडलगत  छापा टाकला असता सुधाकर सोमला चव्हाण वय 32 वर्षे, रा.बलसुर तांडा हे पत्रा शेडसमोर  19  लिटर गावठी  दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले. तर कदेरपाटी येथे सुनिल गणपत राठोड वय 30 वर्षे, रा.पळसगाव तांडा हे 40  लिटर गावठी  दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले. 


पोलीस ठाणे कळंब:  अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पथकाने दि. 27 जून रोजी जुनी दुध डेअरी येथे छापा टाकला असता आशा रवि काळे वय 25 वर्षे,रा.जुनी दुध डेअरी कळंब या 10  लिटर गावठी  दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले.    

पोलीस ठाणे उस्मानाबाद (शहर):  अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद-शहर पो.ठा. च्या पथकाने दि. 27 जून रोजी साठे चौक येथे छापा टाकला असता रतन संतु काळे वय 54 वर्षे,रा साठे चौक,दुध डेअरीच्या पाठीमागे उस्मानाबाद हे 15  लिटर गावठी  दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले.

पोलीस ठाणे तामलवाडी:  अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन तामलवाडी पो.ठा.तामलवाडी च्या पथकाने दि. 27 जून रोजी देवकुरळी गावात छापा टाकला असता संजय गायवाड वय 30 वर्षे,रा.देवकुरळी  हे 10  लिटर गावठी  दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले. तर खडकी गावात छापा टाकला असता सचिन बजरंग राठोड वय 25 वर्षे,रा.खडकी हे 10  लिटर गावठी  दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले

             यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top