लोहारा दि . २८ : 
तालुक्यातील बेंडकाळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोहयो व मनरेगा अंतर्गत झालेल्या कामात गैरप्रकार  झाले असल्याचा आरोप करीत याप्रकरणी  अनेक वेळा प्रशासनास निवेदन देऊन संबंधितावर  कार्यवाही करण्याची मागणी येथील सामाजिक  कार्यकर्ता   माहेश गोरे यांनी केली. परंतु अद्याप  कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा महेश गोरे यांनी बेंडकाळ ग्राम पंचायत कार्यालयाअंतर्गत रोजगार हमी योजना व मनरेगाच्या माध्यमातून  झालेल्या कामात  संबंधितांनी गैरप्रकार केल्याने संबंधितावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा    दि. 29  जून रोजी लोहारा पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात  आत्मदहन करण्याचा ईशारा गोरे  यानी लेखी निवेदनाद्वारे  दिले आहे. 


 
लोहारा तालुक्यातील बेंडकाळ ग्रा पं मधील गैरप्रकाराबाबत  निवेदन देऊन देखील दोषीविरुध्द अद्याप कार्यवाही झाली नाही. तसेच  बेंडकाळ ग्राम पंचायत अंर्तगत मनरेगा व रोहयो अंतर्गत झालेले कामे जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात आल्याचे  संबधीत विभागास निदर्शनास आणून देखील अद्याप कार्यवाही झाली नाही. तर लघु  पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून झालेल्या  कामात जेसीबी मशीनच्या साहाय्याने काम करुन त्यातही गैरप्रकार झाल्याचा उल्लेख  करण्यात आला आहे

. यासह विविध योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावे असे लेखी निवेदन देऊन ही कार्यवाही झाली नाही 

प्रशासनाने अद्याप या निवेदनाची दखल घेतली नसून आता 29 जून रोजी  आत्मदहन करणार  का ?  संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करणार याकडे  लक्ष वेधले  आहे.

 
Top