तुळजापूर दि .२८

शहरातील लोहिया मंगल कार्यालयात आयोजित लसीकरण शिबिरात तब्बल  १६२ नागरिकांना लस देण्यात आली. या वेळी नगरसेवक अमर मगर यांच्या वतीने लस घेणाऱ्या नागरिकांना फळांचे रोप भेट देण्यात आले. 

दरम्यान पालिकेच्या लसीकरण मोहिमेत गेल्या आठ दिवसांत शहरातील ४५ वर्षा पुढील तब्बल ९७१ नागरिकांनी लस घेतली.
प्रारंभी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी उपनगराध्यक्ष दुर्गादास अमृतराव यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक अमर मगर, पालिकेचे वसूली प्रमुख वैभव अंधारे, डॉ. इल्यास शेख, कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक आदींची उपस्थिती होती.


यावेळी लोहिया, माऊली नगर, दयानंद नगर आदी भागातील १६२ नागरिकांनी लस घेतली. दिवसांत ४५ वर्ष वयाच्या पुढील ९७१ नागरिकांनी लस घेतली. लोहिया मंगल कार्यालयातील लसीकरण मोहिमेत लस घेणाऱ्या नागरिकांना नगरसेवक अमर मगर यांचा वतीने फळाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. घरोघर नागरिकांना निमंत्रण देऊन लस घेण्यास आवाहन करण्यात आले, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. 

लसीकरण केंद्रावर नागरिकांना चहा आणि बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

सदरील लसीकरण केंद्रास पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव, लक्ष्मण उळेकर, चंद्रशेखर जगताप, किरण खपले, राजेश कदम, स्वप्निल कुलकर्णी, शहाजी बडोदकर, आशिष फंड, संजय साळुंके, महेश पांचाळ, अजय हंगरगेकर, आलम शेख, किशोर बोबडे, महेश परदेशी आदींनी सदिच्छा भेट दिली.


गेल्या आठ दिवसांत ९७१ नागरिकांनी लस घेतली
नगरपालिकेच्या वतीने गेल्या ८ दिवसांत शहराच्या विविध भागात ८ लसीकरण शिबीर घेण्यात आले. यामध्ये सर्वाधिक २०३ दिपक चौक शिबिर, लोहीया भाग शिबिर  १५८, जिजामाता नगर शिबिर ११७, विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिबिर  ११०, तुळजापूर खुर्द शिबिर  १०८, विश्वास नगर शिबिर १०६, न प शाळा क्रमांक शिबिर  २ - ९९, सराया धर्मशाळा शिबिर ७७ अशी संख्या राहिली आहे.
 
Top