तुळजापूर दि . २८
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य अधिकारी व तालुका जेष्ठ तपासणीस शरद पारवे ३४ वर्ष सेवा पूर्ण करून वयाच्या ५८ वर्षी २५ जून रोजी सेवानिवृत्त झाले.
त्यानिमित्त त्यांचा सत्कार दादासाहेब चौधरी देवसिंगा विकास सोसायटी, शिराढोण विकास सोसायटी यांच्या वतीने करण्यात आला.
त्याप्रसंगी बँकेचे अधिकारी लक्ष्मण गुड्डे, नंदकुमार मगर, कमलाकर पाटील, हेमंत कंनगरकर, सुनील देवळालकर, प्रदीप हंगरगेकर, शिवशंकर शिंदे, शरद अंबुरे, श्रीमती सुरेखा सोमवंशी,अभिजीत शिरसाठ, प्रभाकर सूर्यवंशी, शिवाजी लोंढे, किरण भोसले आदींची उपस्थित होते.
शरद पारवे यांनी आपल्या ३४ वर्षांच्या कार्यकाळात उस्मानाबाद, येडसी,परंडा, सावरगाव, काटी, मंगरूळ, पिंपळा, काटगाव, आरळी बुद्रुक आणि तुळजापूर येथे विविध पदावर काम केले आहे.