मुरूम, दि.१३ :
युवासेनाप्रमुख तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुम ता. उमरगा येथेविविध कार्यक्रम संपन्न.
युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी यांच्या संकल्पनेतून युवासेना, उमरगाच्या वतीने मुरूम शहरात गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे किट, मास्क व सॅनिटायझरचे रविवारी दि.१३ जुन रोजी वाटप करून ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल संजय नायकल, वैद्यकीय अधिकारी डाॅ.सत्यजित डुकरे, विकास फुगटे, राजेंद्र कारभारी, महेश निंबरगे, जगदीश निंबरगे, संजय आळंगे, माधवराव शिंदे, अतिश चौधरी, नाना टेकाळे, प्रमोद ढंगे, भगत माळी, विशाल मोहीते, जयसिंह खंडागळे, लखन सञे आदींनी पुढाकार घेऊन कार्यक्रम पार पाडला.