मुरुम,  दि.१३  : 
महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजपूत समाज व युवासेना, मुरुम मार्फत महाराणा प्रतापसिंग महाराज यांच्या प्रतिमेस राजपूत दादा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  करुन अभिवादन करण्यात आले. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्मशानभूमीत युवासेनेच्या वतीने झाडांचे रोपण करण्यात आले. 

यावेळी युवासेना शहर प्रमुख भगत माळी, वैद्यकीय अधिकारी विक्रम गहेरवार, श्रीधर इंगळे, मोहन जाधव, रजनीकांत वाघ, गोपाळ हिंगोले, विठ्ठल आप्पा फुगटे, बबनराव बनसोडे, युवराज दादा राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती. नितीश गहेरवार, संतोष जाधव, मनोज गहेरवार, शिव जाधव, जय पवार, मोन्याभाई राजपूत, शुभम राजपूत, धिरज राजपूत, साई खंडागळे, ओम राजपूत आदींनी पुढाकार घेतला.   
 
Top