नळदुर्ग ,दि. १३ : 
तुळजापूर तालुक्यातील  गुळहळ्ळी येथिल  प्रतिष्ठित शेतकरी  सोपानराव राम घोडके वय ६८ वर्ष यांचे  रविवार दि.१३ जुन रोजी  सकाळी ७.३० वाजता अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,एक मुलगी,  नातवंड असा परिवार आहे. 

गुळहळ्ळी ता.तुळजापूरयेथिल ग्रामपंचायतीच्या संरपच सौ. मिरा सचिन घोडके यांचे सासरे तर   भाजपा युवा मोर्चा उस्मानाबाद   जिल्हा सरचिटणीस सचिन घोडके यांचे वडील होत. 
त्यांच्या पार्थिवावर गुळहळ्ळी येथिल त्यांच्या शेतात दुपारी १ वाजता अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top