नळदुर्ग , दि. १३ :
महापराक्रमी वीर योध्दा महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि.१३ जुन रोजी सकाळी ९ वाजता नळदुर्ग शहरात मान्यवारांच्या हास्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर कोविड सेंटरमधील रुग्णाना भोजन वाटप करण्यात आले.नळदुर्ग शहरातील माऊली नगर येथिल महाराणा प्रताप चौकात व शास्ञी चौकात महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तर महाराणा प्रताप मंडळाच्या वतीने कोविड सेंटरमध्ये उपचार घेणा-या रुग्णाना भोजन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक विनायक अहंकारी , नितीन कासार, बसराज धरणे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, उद्योजक मनेषसिंह हजारे, सोसायटीचे चेअरमन सुरेश हजारे, भाजप शहराध्यक्ष पद्माकर घोडके , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, संजय जाधव , युवा सेनेचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, भाजयुमो शहराध्यक्ष श्रमिक पोतदार , शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे , तानाजी जाधव ,विलास येडगे , शिवाजी नाईक , भगवंत सुरवसे, सामाजिक सेवक अमर भाळे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर , माजी सैनिक मानसिंग ठाकुर, आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे आदीची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी जिवन हजारे, महेश हजारे, शुभम हजारे, विजयसिंग ठाकुर, जमनसिंग ठाकुर ,आजयसिंग ठाकुर,सचिन ठाकुर आदीनी पुढाकार घेतले. यावेळी नियमाचे पालन करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.