खानापूर, दि.१३:
तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शेकाप्पा बनसोडे वय ५४ वर्ष , यांचे ञउपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे रविवारी निधन झाले.
बनसोडे हे तुळजापूर तालुक्यातील खानापूर परिसरात महामार्गावर असलेल्या फँटसी पोल्ट्री फार्ममध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे.तुळजापूर पंचायत समितीच्या माजी सभापती रूपाताई बनसोडे यांचे ते पती होत.
त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.