नळदुर्ग ,दि.१४ :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग शहरातील मनसेचे माजी पदाधिकारी यांच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार रोजी कोविड़ सेंटर नळदुर्ग येथिल रुग्णाना भोजन देवुन व तसेच कोविड़ योध्दाचा गौरव करण्यात आला. यामध्ये समिता कुट्टे, सुदर्शन जाधव, अजय गायकवाड ,सचिन कांबळेसह आरोग्य कर्मचारी, होमगार्डा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे माजी माजी शहराध्यक्ष दिलीप शंकरशेट्टी,माजी शहराध्यक्ष शिवाजी सुरवसे, माजी विद्यार्थी शहराध्यक्ष शिरीष डुकरे, माजी तालुका संघटक आरूण जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.