नळदुर्ग ,दि.१४ :
येथिल प्रवीण ऊर्फ बापु प्रभाकर टेकाळे वय 33वर्ष, यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथिल मार्कंडय सहकारी रुग्णालयात सोमवार दि.१४ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगी , असा परिवार आहे.
टेकाळे यांचे मुळ गाव मुरुम ता. उमरगा हे असुन ते व्यवसायानिमित्त नळदुर्ग येथे स्थाईक झाल्याची माहिती युवा सेना माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके यानी सांगितले . त्याचा शहरात जाणा-या मुख्य रस्त्यालगत भांड्याचे दुकान आहे. काही वर्षापुर्वी त्यांच्या वडिलाचे निधन झाले आहे. प्रविण ऊर्फ बापू यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.