मुरूम, दि.९ : भाजपा माजी सैनिक आघाडीच्या वतीने उमरगा येथील तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे, की डॉ.आर.डी. शेंडगे यांच्या शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या १० वर्षाहून अधिक वर्षापासून माजी सैनिक व परिवारासाठी रक्षा मंत्रालयाची ECHS द्वारे आरोग्य सुविधा उपलब्ध असून गेल्या वर्षी येथे कोविड सेंटरची मान्यता असल्याने त्यावेळी जवळपास १५  कोविड बाधीत रूग्णांवर यशस्वी उपचार झाले. 


संबंधीत रूग्णांचे बील ईसीएच कार्डवरून घेण्यात आले. परंतु चालूवर्षी सदरील रिसर्च सेंटरला कोविड उपचाराची मान्यता न दिल्याने ECHS कार्ड धारकांना कोविड साथरोगाचे उपचाराचा लाभ घेता आला नाही. तसेच इतर ठिकाणी मान्यता असली तरी आर्थिक अडचणीमुळे व भरमसाठ बीलामुळे वेळेत उपचार घेता न आल्याने माजी सैनिकांच्या परिवारातील १०-११  जणांना प्राण गमवावे लागल्याचे नमुद केले आहे. आतापर्यंत आम्हाला रूग्णालयाद्वारे कुठलीही तक्रार नाही व उत्तम सेवा देण्यात आली आहे. सदरील हॉस्पिटल सुविधा संपन्न असताना कोविड महामारीच्या दुस-या लाटेत रूग्णांना सेवेपासून वंचित राहावे लागले. तरी जिल्हाधिकारी यांनी शेंडगे रिसर्च सेंटरला कोविड उपचाराची मान्यता देवून आम्हा माजी सैनिकांसह परिवारातील सदस्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी भाजपा माजी सैनिक आघाडी, उमरगा यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

उमरगा तालुकाध्यक्ष दयानंद पवार, सरदार महंमद काजी, नजीर शेख, सुभाष काळे, दत्तात्रय माने, कमलाकर माशाळे  यांच्यासह सव्वीसजणांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत. 
 
Top