चिवरी, दि.९ :
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अंतर्गत गावोगावी जाऊन निराधार योजनेतील येथील १२ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, संचालक सुनील चव्हाण व संचालक मंडळ कार्यकारी संचालक विजय घोणशे यांच्या मार्गदर्शनाखाली' बँक आपल्या दारी 'ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार चिवरी येथील निराधारांना एप्रिल व मे महिन्याचे २००० रुपयाचे अनुदान १२ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरी जाऊन वाटप करण्यात आले. यासाठी बँक शाखा अधिकारी डी.आर.घोडके , विकास सोसायटी सेवा कार्यकारी अणदुरचे सेक्रेटरी एस.एन.हांडगे , माजी शाखाधिकारी मोतीराम चिमणे, आदींनी पुढाकार घेतला होता. यावेळी सरपंच अशोक घोडके, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.