तुळजापूर, दि. २३ :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इतर मागासवर्गीय सेलसाठी स्वतंत्र कार्यकारणी  जाहिर करून कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले आहे.

 जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, तालूका अध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे,ओ. बी.सी. तालुकाध्यक्ष विकी घुगे यांच्या उपस्थितीत निवडी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थेकडून नवनिर्वाचित  घोषित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तालुका उपाध्यक्षपदी महेश बिराजदार (नंदगाव), महेश माळी (काटगाव ) गणेश सातपुते (सावरगाव  )विठ्ठल माळी (तामलवाडी ) तर सचिवपदी नितीन कुंभार,दीपक माळी याना  निवडीचे पत्र देण्यात आले. 

यावेळी अनिल पारवे, रुबाब पठाण, दिगंबर खराडे,विजय सरडे,खंडू जाधव, बबन गावडे, सचिन कदम, संदीप गंगणे,शरद जगदाळे, तोफीक शेख, अप्पासाहेब पवार, गणेश नन्नवरे संकर्षण देशमुख  आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड.अमोल पाटील वागदरीकर व आभार विकी घुगे यांनी मानले. 

राज्यात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या शहरी आणि ग्रामीण भागातील निवड करून कार्यकर्त्यांना सक्रिय केले जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस कडून तरुण वर्गाला जबाबदारी देऊन पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
 
Top