तुळजापूर, दि. २३ :
नव्याने शासनाच्या निर्देशाप्रमाणे शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असुन लोटस पब्लिक स्कूलच्या वतीने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ५० मुख्याध्यापकांच्या उपस्थित २०० झाडांचे उत्सर्फुतपणे वृक्षारोपण करण्यात आले.
तुळजापूर - लातूर -सोलापूर बायपास रोड येथील लोटस पब्लिक स्कुल तुळजापूर येथे तीर्थ व अपसिंगा बीट मुख्याध्यापक यांच्या हस्ते २०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. मान्यवरांचे स्वागत याप्रसंगी संजय जाधव व लक्ष्मीकांत शहापुरे यांनी केले.
याप्रसंगी तुळजापूर गटशिक्षणाधिकारी डॉ. वाय. के. चव्हाण, तीर्थ बिट केंद्रप्रमुख एस एस महाजन, अपसिंगा बीट केंद्रप्रमुख ऋषिकेश भोसले व जि. प. प्राथमिक शाळांचे ५० मुख्याध्यापक उपस्तिथ होते. लोटस पब्लिक स्कूल शहरापासून काही अंतरावर असल्यामुळे वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन करण्यासाठी प्रशालेच्या वतीने विशेष नियोजन केले होते. गटशिक्षण कार्यालय आणि मुख्याध्यापकांच्या चमूने उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन वृक्षारोपण केले.