उस्मानाबाद ,दि.१८ :
पोलीस ठाणे, ढोकी: भुजंग शेंडगे, रा. तुगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 22.05.2021 रोजी 00.01 ते 04.00 दरम्यान राहत्या घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपले असतांना अज्ञात व्यक्तीने घरातील 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन स्मार्टफोन व 3,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली होती. यावरुन ढोकी पो.ठा. येथे गु.र.क्र. 164 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 380 नुसार दाखल आहे.
गुन्हा तपासा दरम्यान ढोकी पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री. सुरेश बनसोडे पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करुन व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे निखील राम पेठे, वय 19 वर्षे, यास आज दि. 18 जून रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालापैकी सॅमसंग स्मार्टफोन जप्त केला असुन गुन्ह्याचा उर्वरीत तपास पोलीस करत आहेत