उस्मानाबाद ,दि.१८:
पोलीस ठाणे, कळंब: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पथकाने दि. 17 जून रोजी कळंब शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करुन खालील नमूद व्यक्तींविरुध म.जु.का. अंतर्गत स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
पहिल्या घटनेत विजयकुमार राखुडे, रा. खडकी, ता. कळंब हे कळंब शहरातील सनराईज हॉटेल शेजारी कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,750 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
दुसऱ्या घटनेत जनैद बेग, रा. डिकसळ, ता. कळंब हे बाजार मैदान, कळंब येथील पत्रा शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,120 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
तीसऱ्या घटनेत 1)सलिम बागवान 2)नवनाथ रामिष्ठ 3)प्रदुम्न खराडे 4)सुनिल दत्त, चौघे रा. कळंब 5)सचिन कसबे, रा. मोहा 6)धनराज आल्टे, रा. मसला, ता. तुळजापूर हे सर्व कळंब येथील मराठवाडा खानावळ शेजारील शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 12,000 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले