पोलीस ठाणे, उमरगा: सिताबाई सोमला राठोड, रा. एकोंडीवाडी, ता. उमरगा या दि. 16 जून रोजी गावातील मारुती मंदीराजवळच्या पत्रा शेड समोर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 1,400 ₹) बाळगलेल्या असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
पोलीस ठाणे, वाशी: मिरा शंकर शिंदे, रा. पिंपळगाव, ता. वाशी या दि. 17 जून रोजी रुई शिवारातील एका पत्रा शेड मागे 9 लि. गावठी दारु (किं.अं. 740 ₹) बाळगलेल्या असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): अभिजीत सतीश लोंढे, रा. भानसगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 17 जून रोजी गावातील जि. प. शाळेजवळील एका पत्रा शेड मध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 610 ₹) बाळगलेले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.