उस्मानाबाद, दि.१८ :

पोलीस ठाणे, उमरगा: उमरगा पो.ठा. गु.र.क्र. 375 / 2021 भा.दं.सं. कलम- 394, 457, 34 या गुन्ह्यातील आरोपी- समाधान रवि चव्हाण उर्फ समिर, वय 23 वर्षे, रा. गंगेवाडी, ता. सोलापूर (द.) हा उमरगा पो.ठा. येथे पोलीस कोठडीत आहे. दि. 16 जून रोजी 13.30 वा. सु. पोलीसांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने कोठडीतील बाथरुमच्या दरवाज्याच्या प्लायवुडचा तुकडा काढून त्या तुकड्याने स्वत:च्या डाव्या मनगटातील रक्तवाहिनी कापुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच तो लाकडी तुकडा कोठडीतील शौचालयामध्ये टाकून व पाणी ओतून पुरावा नष्ट केला. यावरुन उमरगा पो.ठा. चे पोलीस कॉन्‌स्टेबल- भागवत घाटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरवेरुन नमूद आरोपीविरुध्द भा.दं.सं. कलम- 309, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top