उस्मानाबाद, दि.१३
मुरुम: शिराज खैराटे, रा. आष्टाकासार, ता. लोहारा हे दि. 12 जून रोजी गावातील नादुग्री कट्ट्याजवळ 8 लि. गावठी दारु (किं.अं. 830 ₹) बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, ढोकी: 1)कालीदस शिंदे 2)सुनिल शिंदे 3)लिलाबाई, तीघे रा. दत्तनगर, पारधी पिढी, ढोकी हे दि. 12 जून रोजी राहत्या वस्तीवर गावठी मद्य निर्मीतीचा 450 लि. द्रवपदार्थ बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत 1)नाना काळे 2)भागवत शिंदे 3)आंबादास काळे, तीधे रा. पारधी पिढी, ढोकी हे याच दिवशी राहत्या परधी पिढीवर गावठी मद्य निर्मीतीचा 450 लि. द्रवपदार्थ बाळगलेले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, वाशी: विशाल झोरे, रा. ईट, ता. भुम हे दि. 12 जून रोजी गावातील पाथ्रुड चौक रस्त्यालगत देशी दारुच्या 7 बाटल्या (किं.अं. 420 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी गावठी मद्य निर्मीतीचा द्रव पदार्थ जागीत ओतून नष्ट केला व अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.