पोलीस ठाणे, कळंब: डॉ. अभिजीत लोंढे हे दि. 12 जून रोजी 11.30 वा. सु. नर्सिंग होम, कळंब येथे लसीकरणाचे काम करत होते. यावेळी ढोर गल्ली, कळंब येथील बालाजी भिवाजी नरहिरे यांनी लसीकरण केंद्राच्या बाहेर येउन मोठमोठ्याने आरडा- ओरड करुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावर लोंढे यांनी नरहिरे यांस हटकले असता नरहिरे यांनी लोंढे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन लोंढे करत असलेल्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला.
यावरुन अभिजीत लोंढे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नरहिरे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 323, 504 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.