नळदुर्ग, दि. १० : 
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी जाऊन  ग्रामस्थाची आरोग्य  तपासणी करण्यात येत आहे.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्गाने कहर केला होता.हे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गाव कोरोना संसर्गमुक्त करण्यासाठी आलियाबाद ता. तुळजापूर येथिल  ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी जाऊन ऑक्सिमीटरने व तापमान मापक यंत्रनेने तपासणी करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना ताप,सर्दी, खोकला, असेल अशा नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याची सुचना करण्यात येत आहे. तसेच मास्क वापरणे व सॅनिटायझरचा  वापर करणे अशी जनजागृती करण्यात येत आहे.


यावेळी सरपंच ज्योतीका चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या घमाबाई राठोड, रेखा चव्हाण, आशा कार्यकर्ती रिषा चव्हाण, अंगणवाडी सेविका शानुबाई पवार, हॅलो मेडिकलच्या रिना चव्हाण ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले उपस्थित होते.
 
Top