पुणे,दि. ७ : 
हिंजवडी : पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत असलेल्या एका कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 

आगीत कंपनीतील ३७ पैकी १७ कामगार बेपत्ता असून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायजर बनवत असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले असावे असा प्राथमिक  अंदाज वर्तवण्यात येत आहे. आतमध्ये अडकलेल्या मध्ये काही महिला कामगारांचा समावेश असल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली असून, पौड पोलीस आणि संबंधित यंत्रणा आग विझवीण्याचे प्रयत्न करत आहे.
 
Top