उस्मानाबाद, दि. 07 : 
उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 7 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 142 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर आज मृत्युची नोंद झाली नसली तरी मागील काही दिवसात 6 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आज करण्यात आली आहे. तसेच आज दिवसभरात 296 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 56 हजार 140 इतकी झाली आहे. यातील 53 हजार 388 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 282 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 470 जणांवर उपचार सुरु आहेत.


 
Top