बीड , दि.८ : 
 येथे विश्व वारकरी सेना बीडची बैठक होवुन   बीड जिल्हा विश्व वारकरी सेनेची सर्वांनुमते पुढील प्रमाणे कार्य कारणीची निवड करण्यात आलीआहे. जिल्हाध्यक्ष पदी हभप डॉ केशवदास महाराज वैष्णव यांची  तर उपाध्यक्षपदी हभप. परमेश्वर महाराज काळे यांची  निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोषाध्यक्षपदी हभप महादेव महाराज लांडे., प्रवक्तापदी हभप नारायण महाराज राऊत, सचिवपदी हभप विश्रांत महाराज नाईकवाडे, सहसचिव म्हणुन हभप शहादेव महाराज लांडे, सल्लागार  हभप लक्ष्मण महाराज माटकर,, प्रसिद्धी प्रमुख हभप गणेश महाराज गिराम, संपर्क प्रमुख हभप विठ्ठल महाराज मार्कंडेय  यांची निवड करण्यात आली आहे. 


तसेच तालुका अध्यक्ष व तालुका निहाय कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तरी ईच्छुक हभप महाराज मंडळींनी विश्व वारकरी सेना जिल्हा अध्यक्ष डॉ केशवदास महाराज वैष्णव यांच्यासी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top