जळकोट,दि२५ : मेघराज किलजे

नवसर्जनशील साहित्य परिवारातर्फे   गुगल मिट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर राज्यस्तरीय मार्मिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात प्रमुख पाहुण्यांसह महाराष्ट्रभरातून ३५ कवी सहभागी झाले होते.

या कवी संमेलनात निमंत्रित कवींनी मजुरांच्या समस्या, पुनर्वसन, स्त्री-भ्रूण हत्या, शेतकरी बापाचे प्रश्न, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विकृती, शासकीय भ्रष्टाचार उदासीनता, भारतीय संविधान, बंधुभाव, महामानवांचे विचार अशा विविध वास्तववादी विषयांवर कवितांमधून मार्मिक भाष्य सादरीकरण केले. यास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमासाठी खान्देशातील सुप्रसिद्ध कवी व कथाकार सुनील गायकवाड, चाळीसगाव यांनी अध्यक्षपद भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मदन देगावकर, बबनदादा चखाले, बापूसाहेब भोंग, बाबा तारे, संजय साळुंखे उपस्थित होते. 
निमंत्रित कवींमध्ये तुषार पाटील निंभोरेकर, लक्ष्मण सांगवे, करणसिंग तडवी, किरण हिरे,  संजय दोबाडे, बापूसाहेब सोनवणे, संतोष पावरा, वर्षा शिदोरे, स्नेहल सोनटक्के, डॉ. शुभा लोंढे, उमा लुकडे, आत्माराम हारे, औदुंबर भोसले, प्रज्ञा आपेगावकर, शीतल ढगे, ओंकार गुरव, विद्याताई गुरव, योगिता कोठेकर, आशाताई शिंदे, संजय दोबाडे, दिलीपकुमार चव्हाण, योगेश बोऱ्हाडे, गौरव नेवसे, गणेश पुंडे, सुरज अंगुले आदि कवींनी आपल्या कविता सादर केल्या. सुत्रसंचलन व आभार आयोजक समाधान गायकवाड यांनी मानले
 
Top