तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील केमवाडीचे सुपुत्र तथा कर्तत्वान, सर्वसामान्यांचे कैवारी, वैचारिक निर्णयक्षमता असणारे व विकासासाठी नेहमी झपाटलेले नेतृत्व व तरुणांमध्ये आदर्शवत वाटचाल करणारे नेतृत्व म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अॕड अनिल काळे यांचे बुधवार दि. 5 जुन रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्त केलेला हा छोटासा शब्दप्रपंच
भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत तथा वाकबगार असलेले, हजरजबाबी, स्वभावाने शांत, संयमी, उच्च शिक्षित, कायदा पदवीधारक, सर्वांच्या सुखदु:खात सतत धावून जाणारे व्यक्तीमत्व असे अष्टपैलू नेतृत्व असणारे , व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तुळजापूर तालुक्यातील केमवाडी सारख्या छोट्याशा गावातून आलेले भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अनिल काळे यांनी समाजकारणातून राजकारण करीत प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित केंदीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंढे, महाराष्ट्राचे सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आदी नेत्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सुधीर पाटील, अविनाश कोळी, नितीन काळे, भाजपचे मिडिया सेलचे जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे, देवानंद रोचकरी, नागेश नाईक, सत्यवान सुरवसे, विजय शिंगाडे, गुलचंद व्यवहारे, शिवाजीराव बोधले, सुहास साळुंके, दत्ता राजमाने, साहेबराव घुगे, आदी सवंगड्यासमवेत भाजपच्या माध्यमातून विविध पदे भुषवत तालुक्याच्या राजकारणात एक वेगळी छाप पाडली आहे.
भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेल्या 25 वर्षापुर्वी आपला राजकीय प्रवास सुरु करत केमवाडीचे सरपंचपद, सावरगावसह केमवाडी, गवळेवाडी, पांगरदरवाडी, गंजेवाडी, जळकोटवाडी, या गावाचा समावेश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमनपद दिमाखात भुषविले. विविध पदे व्यवस्थितपणे भुषवत व त्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यत पोहचून तालुक्यात तळागाळातील लोकांपर्यत पोंहचाणारे नेतृत्व म्हणुन त्यांनी एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
शेतकरी कुटूंबातील काळे यांनी कायद्याची पदवी घेतल्या नंतर उस्मानाबाद येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. या वकिली व्यवसायाचा माध्यमातून त्यांनी प्रारंभी तळागाळातील सर्व सामान्य लोकांशी जनसंपर्क वाढविला. आपला व्यवसाय सांभाळत मागील पंचवीस वर्षापासून तुळजापूर व उस्मानाबाद तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा एक सर्व सामान्य निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत.
अॕड . अनिल काळे हे नेहमी लोकांची कामे करण्यासाठी अगदी तळमळीने झटत असतात. पक्षाचे कार्य करित असताना त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गटबाजीला थारा दिला नाही. पक्षातील जेष्ठांचा आदर करत सर्व पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत मिळुन मिसळून राहत. भारतीय जनता पक्षाचे कार्य अखंडितपणे अविरत सुरू आहे. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून अगदी निष्ठेने काम करीत असताना त्यांनी अनेक पदे भुषवून आपल्या कामाचा ठसा उमटवला.पक्षीय राजकारणाबरोबरच त्यांनी सर्व सामान्य माणूस म्हणून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केलीत. विविध सामाजिक उपक्रम राबविले. आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. कै. गोपीनाथ मुंढे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत असताना कै मुंढे यांचेही त्यांना राजकीय मार्गदर्शन लाभले. सन 1996 मध्ये पक्ष कार्यास सुरुवात करुन उस्मानाबाद जिल्हा सहकार आघाडीचा अध्यक्ष, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, विधान सभा मतदार संघाचा पालक ते सध्या भाजपचे प्रभारी, व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून काम करत आहेत.
काळे यांना आपल्या काॅलेज जीवनापासूनच सामाजिक कार्यासोबत राजकीय क्षेत्राची आवड होती. वकिली व्यवसाय सुरू असतानाच तो व्यवसाय सांभाळून राजकारणातून समाजकारण हे सुत्र उराशी बाळगून 1994 साली सावरगाव ता.तुळजापूर या गणातून त्यांनी प्रथम तुळजापूर पंचायत समितीची निवडणूक लढविली, परंतु या निवडणुकीत त्यांना अपयश आले. परंतु अपयश हिच खरी यशाची पहिली पायरी आहे समजून पराभवाने खचून न जाता, परत नव्या उमेदीने आजतागायत भारतीय जनता पक्षाचे कार्य अखंडितपणे अविरतपणे चालू ठेवले आहे. विविध राजकीय रंगतदार आखाडय़ात उतरून आपले राजकीय नशीब आजमावत 1997 ते 2000 साली भारतीय जनता पक्षाचे सहकारी आघाडीचे अध्यक्ष, 2000 ते 2003 साली भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष,2003 ते 2006 साली भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, 2006 ते 2009 साली पुन्हा पक्षाने जिल्हा उपाध्यक्षपदाची जवाबदारी दिली. हे उपाध्यक्षपद सांभाळत असताना केमवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द करून 2008 ते 2013 केमवाडीचे सरपंचपद सर्वांना विश्वासात घेऊन लोकांपय॔त शासनाच्या विविध योजना राबवून मोठ्या दिमाखात व तत्परतेने भुषविले. सन 2007 ते 2009 साली सावरगावसह केमवाडी, गवळेवाडी, पांगरधरवाडी, गंजेवाडी, जळकोटवाडी या गावांचा समावेश असलेल्या सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमनपद अनेक लोकोपयोगी निर्णय घेत मोठ्या दिमाखात भुषविले.त्यांची काम करण्याची पद्धत, सचोटी, जिज्ञासू वृत्ती पाहून पक्षश्रेष्ठीनी त्यांना पुन्हा 2009 ते 2014 साली भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस पद दिले. 2009 साली तुळजापूर विधानसभेची शिवसेनेकडे असणारी जागा भाजपला मिळावी यासाठी सर्व कार्यकारणीसोबत विशेष प्रयत्न केले. तुळजापूर तालुक्यात 100 टक्के "वन बुथ टेन युथ" ही रचना राबविली .
सध्या ते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंहजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्यपद तत्परतेने सांभाळत असून आजपर्यंत त्यांनी तुळजापूर तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, कुलस्वामिनी सहकारी सुतगिरणी, कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना, व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका जयपराजयची तमा न बाळगता मोठ्या हिमतीने लढविल्या .यामुळे त्यांना राजकीय आखाडय़ातील अनुभव असून आजपर्यंत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत त्यांनी विधानसभेची उमेदवारीही मागितली होती. उमेदवारी नाही मिळाली तरी त्यांनी युतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केला.
तुळजापूर तालुक्यातील काटी जिल्हापरिषद गटातील भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.अनिल काळे यांचेकडे एक उच्च शिक्षित, अभ्यास पूर्ण नियोजन करणारा व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोंचणारा भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.
याची देही याची डोळा, मरण मी पाहिले; मृत्यूला स्पर्शून गेलेला प्रवास
ॲड.अनिल काळे यांना मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला चार-पाच दिवस केमवाडीत राहुनच उपचार घेतले. परंतु प्रकृतीत अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सिटीस्कॅन स्कोअर 23 होता. व ऑक्सिजन लेव्हलही 75 पर्यंत आली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर व तेथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले.आयसीयूबाहेर आल्यानंतर काळे यांनी माझा कोरोना संसर्गातील कालावधी माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी फारच कठीण गेल्याचे सांगून माझे संपूर्ण कुटुंब काळजीत होते. काही तरी विपरीत घडत असल्याची क्षणभर जाणीव झाली...मृत्यूने केलेल्या पाठशिवनीत आपण कसे बरे जिंकलो हा प्रश्न त्याना आजही पडतो.
माझ्या हितचिंतकांनी माझ्या आजारपणात केलेल्या प्रार्थनामुळे व सर्वांच्या आशिर्वादामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करून सहिसलामत बाहेर आल्याचा आनंद व्यक्त करावा कि आपल्या कोरोनाच्या सहरुग्णांचा अंत झाल्याचा शोक व्यक्त करावा काहीच कळत नाही अशा भावना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर आपण लवकरच जनतेची कामे करण्यासाठी आपल्या सेवेत रुजू होईन असंही त्यांनी म्हटले आहे.
अशा या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
उमाजी गायकवाड
पञकार , तुळजापूर