उस्मानाबाद , दि . २६
पोलीसा ठाणे, उमरगा: उमरगा एम.आय.डी.सी मधील श्री लक्ष्मी तिम्मप्पा फुड या कारखान्यावर उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला. या वेळी तेथे अवैधरित्या 12,000 लिटर डिझेल एका टाकीत साठवलेले आढळल्याने पोलीसांनी नमुद डिझेल साठा, 2 विदयुत पंप असे सामान जप्त केले. या प्रकरणी पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन महेश गवळी रा. कर्नाटक राज्य यांसह जागेच्या अज्ञात मालका विरुध्द जिवनावश्यक कायदा कलम 3,7 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.