उस्मानाबाद दि.२६

पोलीस ठाणे, तुळजापुर : विकास अशोक जाधव  वय 39 वर्षे, रा. सांगवी (मार्डी) हे दि. 21 जून रोजी 21.00 वा. सु. गावातील रार्ष्टीय महामार्गावरुन पायी जात होते. या वेळी तुळजापुर –सोलापुर जाणा-या कार क्रं. एम.एच.25 आर.6105 ने त्यांना धडक दिल्याने जाधव हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी स्वाती यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top