परांडा, दि. 22 :
परंडा शहरातील रहिवासी असलेले लक्ष्मण दामू शिंदे व सुधाबाई लक्ष्मण शिंदे यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेतील पात्र लाभार्थी म्हणून त्यांना जमीन मिळाल्याचा सातबारा उपविभागीय अधिकारी सौ मनीषा राशेनकर यांच्या हस्ते देण्यात आला .
याप्रसंगी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर ,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, सरचिटणीस घनश्याम शिंदे , ,तलाठी चंद्रकांत कसाब, कोतवाल मैनोद्दीन शेख आदी यावेळी उपस्थित होते.