तुळजापूर, दि.२३ : 

 तालुक्यातील मोरडा-तडवळा ग्रामपंचायत हद्दीतील अभिरुची वॉटर प्लांट (पाणी प्रकल्प) यांनी आज पर्यंत शासनाचा कोणताही कर भरत नसल्याने  भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिका-यानी तुळजापूर  तहसीलदार यांना निवेदन देवुन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केले आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील मौजे मोरडा-तडवळा ग्रामपंचायत हद्दीतील अभिरूची वॉटर प्लांट गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदरील वाटर प्लांट मालकांनी ग्रामपंचायतला आजपर्यंत एकही वेळेस कर भरलेला नाही त्याचबरोबर तहसील कार्यालय तुळजापूर यांची रॉयल्टी भरली आहे का? याचीही चौकशी करण्यात यावी व सदरील प्लांट साठी लागणारे पाणी ज्या ठिकाणचे वापरत आहेत. त्याची परवानगी आहे का? याचीही चौकशी करावी व पंचनामा करावा असे सदरील अभिरुची वॉटर प्लांट शासनाची फसवणूक करत आहे का? जर करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी,असे निवेदनावर नमूद केले आहे . 

निवेदनावर भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे तालुका अध्यक्ष विजय भोसले,तालुका सचिव दिनेश कापसे यांची स्वाक्षरी आहे.
 
Top