तुळजापूर,दि.२२:
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला खुर्द तसेच दीपक नगर, वाघजाई घाट शाळा या शाळांमध्ये घन वृक्ष लागवड या अंतर्गत मियावाकी वृक्षलागवड करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात आपल्या केंद्रातील सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण जोमाने करण्यात येत आहे.
यासाठी मसला खुर्द शाळेतील मुख्याध्यापक व सर्व स्टाफ याकामी परिश्रम घेत आहेत. या सर्व शाळांचे केंद्रप्रमुख ऋषि भोसले व विस्ताराधिकारी वायके चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत असून अविरतपणे भेट देऊन सर्व शाळा रंगरंगोटी युक्त व वृक्षारोपण युक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.