लोहारा, दि.२४ :
लोहारा शहरातील काँग्रेस (आय) चे ज्येष्ठ नेते नागन्ना वकील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी दि.२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यावर आले असता गुरुवारी तुळजापूर येथे उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघाचा आढावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोहारा शहरातील काँग्रेस (आय) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच नागन्ना वकील यांनी त्यांच्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष ना जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर,युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, सामाजिक न्याय विभागाचे जालिंदर कोकणे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नागन्ना वकील यांच्यासोबत बसवराज पाटील, दिलीप जाधव, बाबासाहेब जाधव विश्वजीत पाटील, बसवराज तोडकरी, तानाजी सरवदे, अनिल आडे, प्रशांत कारले बाबा पवार यांनीही प्रवेश केला.