उस्मानाबाद,दि.९:
स्थानिक गुन्हे शाखा: गुन्हा करुन फरार झालेल्या आरोपींच्या शोधार्थ मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. यातूनच स्था.गु.शा. चे पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या पथकातील सपोनि- श्री मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, साळुंके, पोना- दिपक लाव्हरेपाटील, पोकॉ- पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर, माने यांनी आज दि. 09 जून रोजी पहाटे च्या सुमारास अशा आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आखले. यात उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथील सन- 2014 मधील गुन्ह्यात फरारी असलेला माणिक रामचंद्र राठोड, रा. गंधोरा, ता. तुळजापूर यासह सन- 2016 मधील स्वतंत्र चार गुन्ह्यांतील फरार आरोपी- संजय तारु जाधव, दिनेश देवीदास राठोड उर्फ धनु, रंगनाथ चंदू जाधव, शाम रामचंद्र पवार, चौघे रा. उस्मानाबाद यांस वेगवेगळ्या ठिकाणांहुन ताब्यात घेउन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.