उसमानाबाद ,दि.९ :
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. 11 जुन रोजी 45 वर्षाच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा डोस दिला जाणार आहे.
याकरिता जिल्ह्यामध्ये दि. 11 जुन रोजी 30 निवडक आरोग्य उपकेंद्रमधुन कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार असुन 2 नागरी प्राथमिक अरोग्य केंद्र, 6 ग्रामीण रुग्णालय,4 उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद आणि पोलीस रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे.