काटी , दि. ९ : उमाजी गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील गोंधळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मोकळ्या जागेत ग्रामपंचायत व शिक्षकाच्या वतीने घनवृक्ष लागवडीचा शुभारंभ उसमानाबाद जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. विजयकुमार फड यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार  फड यांनी गोंधळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देवुन शिक्षकानी राबविलेल्या उपक्रमाची पाहणी केली.  गोंधळवाडी ग्रामपंचायतने शाळेच्या इमारती मागील जागेत कोरोनाच्या संकटकाळात घन वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यानी केले. त्यामुळे शाळेच्या परिसरात निर्सगरम्य वातावरण तयार झाल्याने समाधान व्यक्त करून घन वृक्ष लागवडीची  पाहणी करून नव्याने 100 घन वृक्षाची लागवड मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फड यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचं संवर्धनसुध्दा करणे गरजेचे असून नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करणे गरजे असल्याचे सांगून घन वृक्ष लागवडी बरोबर त्याच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडावी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी  फड यांनी रंगरंगोटी केलेल्या शाळेच्या इमारतीची तसेच प्रयोगशाळा ग्रथालय , डिजीटल वर्गखोल्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. 


 यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड,  सरपंच भगवान मोटे , तुळजापूर प. स.  गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड,  गट शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, उपसरपंच गोपाळ मोटे, केन्द्र प्रमुख रमाकांत वाघचौरे, ग्रामसेविका शोभा देवकते, विस्तार अधिकारी भांगे, वाय. के. चव्हाण ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. बी. तांबोळी, भगवान बाशेवाड,  दत्तात्रय माळी, लालासाहेब मगर, जयमाला वटणे, व्यंकट तोटावार, मंजुषा भुसेष ,ज्योति कुलकर्णी, शंकर राऊत आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top