स्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. तुळजापूर गु.र.क्र. 371 / 2020 या गुन्ह्यातील आरोपी- 1)महेश विष्णू माळी, वय 32 वर्षे, 2)नितीन चांगदेव माळी, वय 27 वर्षे, 3)गणेश शिवाजी माळी, वय 23 वर्षे, तीघे रा. काटगाव, ता. तुळजापूर हे मागील 1 वर्षापासुन पोलीसांना तपासकामी हवे होते. 


स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- साळुंके, पोकॉ- पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर यांच्या पथकास ते तीघे गावी आल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यांना आज दि. 13 जून रोजी काटगाव शिवारातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

 
Top