उस्मानाबाद ,दि.२८

पोलीस ठाणे, आनंदनगर : अमर सुर्यवंशी रा.सांजा  हे आपल्या अर्धवट बांधकाम असलेल्या व दारे- खिडक्या नसलेल्या आपल्या घरात  दिनांक 26-27  जुन दरम्यानच्या रात्री कुटुंबासह झोपलेले होते. या वेळी अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील तीन स्मार्ट फोनसह  10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमर सुर्यवंशी यांनी दि. 27 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर : संतोष बुटटे रा.तुळजापूर यांनी घरासमोर ठेवलेली स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम एच 25 एस 3039 ही दिनांक 12 जुन रोजी पहाटे अज्ञाताने  चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतोष  यांनी दि. 27 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब : माणीक डिकले रा.कल्पना नगर,कळंब यांनी घरासमोर ठेवलेली स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम एच 25 व्ही  3078 ही दिनांक 27 जुन रोजी पहाटे अज्ञाताने  चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                        

 
Top