उस्मानाबाद , दि. २२
पोलीस ठाणे, नळदुर्ग: चालक गुलफाम मुलानी रा. सोलापुर हे दिनांक- 21-06-2021 रोजी 02.35 वा. ट्रक क्रं एम.एच.14 जे एल 7799 ने हैद्राबाद-मुंबई असा महामार्गाने घेवुन जात होते. प्रवासा दरम्यान फुलवाडी टोलनाक्या पुढे 2 की.मी. ट्रक गेला असता 4 अज्ञात पुरुषांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवुन ट्रक थांबवून बाजूच्या ऊसाच्या शेताजवळ नेला. तेथे त्यांनी ट्रकच्या शटरचे कुलूप तोडून आतील 27,058₹ चा माल लुटून नेला. अशा मजकुराच्या गुलकाम मुलानी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, लोहारा: सास्तुर, ता. लोहारा येथील बीएसएनएल भ्रमणध्वनी मनोऱ्याखालील यंत्रणा खोलीतील एक एक्साईड बॅटरी व एक यंत्रणा कार्ड असा 35,000 ₹ चा माल अज्ञाताने दि. 18 जून रोजी पहाटे चोरुन नेला. अशा मजकुराच्या कनिष्ठ अभियंता मनोज कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): कौंडगाव एमआयडीसी परिसरातील महावितरणच्या लघुदाब वाहिनीचे रोहित्र अज्ञाताने दि. 13 जून रोजी पहाटे फोडून रोहित्रातील तांबे धातूच्या तारांची वेटोळी, चार्जर कॉईल असा एकुण 4,00,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुरक्षा रक्षक- मंगेश शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.