तुळजापूर: दि. २९ : 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने बहुजन रयत परिषदेच्या वतीने राज्यव्यापी व निर्धार संवाद अभियान 18 जुलै ते 5 सप्टेंबर  या काळात होत असून यामध्ये विविध सामाजिक विषयावर जनजागरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी तुळजापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.


माजी मंत्री ढोबळे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे महिला प्रदेशाध्यक्ष सौ. कोमल साळुंखे, बहुजन रयत परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजीत ढोबळे, प्रदेश सचिव विश्वास शिरसागर,  अध्यक्ष ईश्वर शिरसागर, बालाजी गायकवाड आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे यांनी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष सौ कोमल ताई साळुंखे यांनी या या यात्रेमध्ये विकासापासून दूर असलेल्या मातंग, मोची, होलार, चांभार, ढोर व धनगर समाजाला संघटित करून त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.


पत्रकार परिषदेमध्ये  ढोबळे यांनी ही पाचवी राज्यस्तरीय नव निर्धार संवाद अभियान यात्रा आहे ,  नाशिक विभाग पुणे विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग औरंगाबाद विभाग बुलढाणा विभाग आणि मुंबई विभाग सलग चालणार आहे . याचा शुभारंभ नंदुरबार येथे होऊन समारोप चिराग नगर येथे केला जाणार आहे, आरक्षणाची अबकड अशी वर्गवारी करण्यासाठी या यात्रेच्या निमित्ताने सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

नव निर्धार संवाद अभियानामध्ये प्रत्येक जिल्हा स्थानी जवळच्या तालुक्यांना एकत्र करून जिल्हा आणि तालुका यांच्या नवीन निवडी होणार आहेत त्याच बरोबर इतर तालुक्यात अभियान संपर्क होऊन जिल्ह्याचे प्रश्न एकत्र केले जाणार आहेत या सर्व कार्यक्रमांमध्ये कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जास्तीत जास्त ५० प्रतिनिधी उपस्थित राहतील याचे नियोजन केले आहे कोणत्याही परिस्थितीत शासनाच्या निर्देशांचे पालन झालेच पाहिजे अशा सक्त सूचना सर्व कार्यकर्त्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.


मराठा आरक्षण लिंगायत आरक्षण मुस्लिम आरक्षण आणि धनगर आरक्षण या आरक्षणाच्या प्रश्नांची सोडवणूक राज्य सरकारने तातडीने केली पाहिजे अन्यथा सरकारला सरकार चालवणे अवघड होणार आहे राज्यकर्त्यांची भविष्यातील राजकारण देखील संपून जाईल असा गर्भित इशारा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी या निमित्ताने दिला छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ओबीसी राजकीय आरक्षण केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे गेले आहेत आठ वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर देखील राज्य सरकारने आवश्यक डाटा न्यायालयासमोर सादर केला नाही असा ठपका लक्ष्मणराव ढोबळे यांनी सरकारवर ठेवला.

ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय केंद्र सरकार येत असल्याचे सांगितले जाते मात्र हे खोटे आहे महाराष्ट्र प्रमाणे इतर राज्याचे आरक्षण हटविण्यात आले नाही केवळ महाराष्ट्राचे आरक्षण ठेवण्यात आले आहे ही तर राज्याचे आरक्षण शाबूत असल्याचेही माजी मंत्री ढोबळे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने बहुजन रयत परिषद नव निर्धार संवाद अभियान चालवत असताना या दुर्लक्षित समाजाकडे जगण्याचा चांगला दृष्टिकोन देण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडणार आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना इतर बाबींना फाटा देऊन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येऊन जास्तीत जास्त शिकले पाहिजे याचा प्रचार जाणीवपूर्वक केला जाणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
 
Top