तुळजापूर दि . २९ :

तुळजापूर शहरातील शामप्रसाद मुखर्जी गृह सोसायटी , हनूमान नगर या हद्धवाढ  झालेल्या भागातील नागरिकांच्या समस्याबाबत  युवा सेनेच्या वतीने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना निवेदन देण्यात आले.

हदवाढ भागील नागरिकांची मोठया प्रमाणात हेळसांड होत आहे, शामाप्रसाद मुखर्जी सोसायटी, हनुमान नगर परिसरात चोरांचा सुळसुळात, त्याच बरोबर रस्ते , गटारी , पिण्याचे पाणी, नळ योजना , लाईट त्याच बरोबर घाणीचे सामराज्य अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . 

मध्यरात्री १ च्या दरम्यान धारधार शस्त्र घेऊन अज्ञात व्यक्ती फिरताना दिसतात यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. 

या हद्दीत अधिनियमात बांधकामे होऊन नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे . तिर्थक्षेत्र तुळजापूर हे दिवसेंदिवस   वाढत असून या भागात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे . 

नविन विकासक नियमागुसार संबधित जागा मालकांना एन. ए. लेआउंट मंजुरी पुर्वी संबधित जागेमध्ये नाली ,रस्ते , प्लेग्राउंड , विद्युत पोलची उभारणी करणे बंधन कारक आहे . विकासक या बाबी पुर्ण करतात परंतू याच्या अनुशंगाने अवश्यक असलेले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विकसीत जागेतील सांडपाणी मुख्य ड्रेनेज लाईनला जोडणे इ . कामे नगर परिषदच्या अखत्यारीत येतात.  

झपाट्याने वाढत चाललेल्या शहराच्या नियोजन बध्द विकास होणे गरजेचे असून या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकत्र येऊन हद्दवाढ भागाचा प्रस्तावीत निधी खेचुन आण्याासाठी प्रयत्न करावेत,  मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर तरी हद्द वाढ भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनावर युवा सेनेचे शहरप्रमुख प्रदिप इंगळे यांनी शिष्टमंडळाने केली, 
निवेदन देताना गोकुळ शिंदे, गोरख पवार, बापूसाहेब नाईकवाडी,प्रतिक रोचकरी, सागर इंगळे, लखन कदम - परमेश्वर, विकास भोसले, दिनेश रसाळ आदि उपस्थित होते.
 
Top